News Flash

‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत आता सायलीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी आता नवी अभिनेत्री दिसणार आहे.

'शतदा प्रेम करावे'

स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी आता ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण होऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. या मालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे.

वाचा : मराठी बिग बॉसच्या घरात ‘खंडोबा’?

सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, ”शतदा प्रेम करावे’ची कथा खूपच रंजक आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाहच्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे. ‘शतदा प्रेम करावे’चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं. स्टार प्रवाहबरोबर काम करायला मिळावं अशी इच्छाही होतीच. ‘शतदा प्रेम करावे’ च्या रुपानं ती पूर्ण होत आहे. यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार.’

उन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 6:00 pm

Web Title: star pravah marathi serial shatada prem karave sneha shah replaced by dnyanada ramtirthakar
Next Stories
1 आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या ‘सायकल’चा ट्रेलर प्रदर्शित
2 ‘मसान’ फेम अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
3 मराठी बिग बॉसच्या घरात ‘खंडोबा’?
Just Now!
X