News Flash

होळी स्पेशल भागात माऊचा धमाल डान्स; शौनकचा पत्ता कट !

'मुलगी झाली हो' मालिकेत रंगणार होळी स्पेशल भाग

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सध्या आनंदी आनंद पाहायला मिळतोय. विलासने माऊचा मुलगी म्हणून स्विकार केला आहे. जिने या जगात पाऊल ठेवण्या आधीपासून फक्त आणि फक्त तिरस्कार सहन केला त्या माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचं स्थान मिळालं आहे.

या मालिकेचा होळी विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या खास भागात प्रेक्षकांना माऊचा डान्स पाहायला मिळणार आहे. “माझी राधा कुठे गेली” या मराठी गाण्यावर प्रेक्षकांना माऊचा डान्स पाहायला मिळेलं. या डान्स सिनच्या शूटिंगमध्ये माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष हिने चांगलीच धमाल केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

एकीकडे घरात मानाचं स्थान मिळाल्याने माऊ आनंदी आहे. मात्र याचवेळी शौनक आणि माऊच्या नात्यात मात्र दुरावा आल्याचं दिसतंय.त्यामुळे शौनक आणि माऊ यांच्यात आलेला दुरावा जाऊन, त्यांचं नातं पुन्हा कधी खुलणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतं आहेत.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील हे वळण नव्या बदलाची नांदी आहे. आजही बऱ्याच ठिकाणी मुलीचा जन्म म्हणजे अपराध मानला जातो. या मानसिकतेला विचार करायला भाग पडणारं मालिकेतील हे वळण आहे. लक्ष्मीच्या पावलांनी माऊचा नुकताच गृहप्रवेश झालाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 5:10 pm

Web Title: star pravah mulgi zali ho mau holi special dance divya subhash kpw 89
Next Stories
1 ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर ‘होळी पावरी हो रही है’
2 टायगर श्रॉफचा डान्स पाहून अनुपम खेर म्हणाले, “मी ही असा डान्स करू शकतो पण…”
3 मुलांना सोडल्यामुळे अभिनेत्रीला सीरिजमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Just Now!
X