News Flash

अभिनेता स्वप्नील जोशीची पहिली टेलिव्हिजन निर्मिती ‘स्टार प्रवाह’वर

एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळेल

नकळत सारे घडले

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो. या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनं त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुन सिहं बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत,या मालिकेची निर्मिती केली आहे.

‘स्टार प्रवाह’नं आपल्या मालिकांतून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. या मालिकेचा नुकताच लाँच केलेल्या प्रोमोचा लुक एकदम फ्रेश आहे. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातलं विलक्षण नातं यात पाहायला मिळत आहे. लोकप्रिय मालिकांमुळे परिचित असलेले हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर या प्रोमोमध्ये दिसत असून बाल कलाकार सान्वी रत्नलिकरचे लोभस, गोड दिसणे लक्षणीय आहे. मात्र, मालिकेच्या कथानकाचा अद्याप उलगडा झाला नाही.

टीव्हीवर निर्माता म्हणून पदार्पण करण्याबाबत स्वप्नील म्हणाला, ‘निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या ‘जीसीम्स’ या निर्मिती संस्थेला मी सहभागी झालो. माझं आणि स्टार प्रवाहचं जुनं नातं आहे. म्हणूनच, ‘स्टार प्रवाह’बरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल होतो. ‘नकळत सारे घडले’ या रोमँटिक मालिकेच्या रुपानं हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. तसंच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 8:27 pm

Web Title: star pravah new marathi serial nakalat sare ghadle swapnil joshi
Next Stories
1 नोटाबंदीवरुन प्रकाश राज यांचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल
2 Tiger Zinda Hai: सलमान मला शिवीगाळ करायचा – अली अब्बास जफर
3 ‘पद्मावती’च्या वादावर भन्साळींचं स्पष्टीकरण
Just Now!
X