‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा अभिनव उपक्रम

गणपती ही बुद्धीची देवता. प्रचंड बुद्धिमत्ता आणि तेजाचे प्रतीक असलेल्या गणेशाचा उत्सव घराघरांत सुरू आहे. तेच औचित्य घेऊन आपल्या वाहिनीवरील मालिकांना यशाचे शिखर गाठून देणाऱ्या लेखकांना एका व्यासपीठावर एकत्र आणत त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने के ला आहे. ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. मालिके च्या यशात लेखकांचा वाटा हा मोलाचा असतो, मात्र कॅमेरामागे असणाऱ्या या लेखकांना त्यांच्या कामासाठी जाहीर कौतुकाची थाप कधीच मिळत नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मालिके चा कणा असलेल्या या लेखकांना एकत्र आणत त्यांना सन्मानरूपी दाद देण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने केला, अशी माहिती वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख आणि स्वत: लेखक – दिग्दर्शक असलेल्या सतीश राजवाडे यांनी दिली.

गेल्या वर्षी वाहिनीने अशाच पद्धतीने सुनील बर्वे, मिलिंद गवळी, वर्षा उसगावकर, अशोक शिंदे, हर्षदा खानविलकर अशा अनुभवी कलाकारांचा सन्मान के ला होता. यावर्षी लेखकांना इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आणत त्यांचा सन्मान करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना लेखक कधीच प्रकाशझोतात येत नाहीत अशी खंत राजवाडे यांनी व्यक्त केली. लेखकांच्या लेखनामुळे कलाकार प्रकाशझोतात येत असतात, मात्र लेखकांना क्वचितच हा प्रकाशझोत अनुभवायला मिळतो. मालिका मस्त चालली आहे. लोकांना आवडते आहे असं आपण म्हणत राहतो. पण या यशाचं खरं श्रेय ज्यांना दिलं पाहिजे ते मालिके चे पटकथा – संवाद लिहिणारे लेखक कौतुकापासून कोसो दूर असतात. लेखक हे कोणत्याही मालिके चा कणा असतात. ज्या पद्धतीने लेखक सध्या लिहितायेत ते खूप प्रभावी आहे, पण ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांना खरी ओळख मिळत नाही. ती ओळख मिळवून देण्याच्या उद्देशानेच हा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुषमा बक्षी, अभिजीत पेंढारकर, किरण कु लकर्णी, पल्लवी करके रा, मुग्धा गोडबोले, शर्वरी पाटणकर, शिल्पा नवलकर, रोहिणी निनावे, मिथिला सुभाष, अभिजीत गुरू, विवेक आपटे, आशुतोष पराडकर, अश्विानी शेंडे, शिरीष लाटकर, चिन्मय कुलकर्णी कौस्तुभ दिवाण, अनिल पवार, नितीन दीक्षित, ओमकार मंगेश दत्त, किरण येले, देवेंद्र बाळसराफ, नमिता नाडकर्णी, संदीप विश्वासराव, अक्षय जोशी आणि गौरी कोडीमाला अशा २५ लेखकांचा यावेळी स्टार प्रवाहकडून सन्मान करण्यात आला. एरव्ही पुरस्कार सोहळ्यात कलाकार-तंत्रज्ञांची गर्दी दिसते, इथे मात्र पहिल्यांदाच लेखकांची गर्दी पाहायला मिळाली. रोजच्या रोज मालिके चं लेखन करणं आणि पहिल्या भागापासून लेखनाची गुणवत्ता टिकवून ठेवणं यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागतात. मात्र आपल्याकडे मालिका यशस्वी झाली की साहजिकच सगळं वलय हे कॅ मेऱ्यासमोर असलेले कलाकार घेऊन जातात. या सन्मानाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हे वलय लेखकांना अनुभवता आलं. आपल्या कामाची दखल घेतली गेली या भावनेने ही लेखकमंडळी भारावून गेली होती, अशी माहिती राजवाडे यांनी दिली.