News Flash

कुणीतरी येणार गं…‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

डोहाळ जेवणासाठी खास तयारी

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे.

आनंदाच्या काळात कार्तिकने फिरवली पाठ
मात्र आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. दीपाच्या पोटात असलेलं बाळ आपलं नाही असा गैरसमज कार्तिकला झाला आहे. दीपावर पूर्ण विश्वास ठेवणारा कार्तिक आज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला आहे. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. त्यामुळे डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.

डोहाळ जेवणासाठी खास तयारी
डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. तर घरातदेखील खास सजावट करण्यात आली असून कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र कार्तिकच्या वागण्यामुळे आता या आनंदावर विरजन पडतं का हे येत्या भागात कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 3:27 pm

Web Title: star pravah rang majha vegla deepa baby shower ceremony kpw 89
Next Stories
1 ‘शाहरुख, सलमान आणि आमिर नाही तर मीच राहणार नंबर वन’, अक्षय म्हणाला…
2 गर्दीचे सीन, गाण्यांच्या चित्रीकरणावर निर्बंध; ‘हे’ असतील चित्रपटसृष्टीसाठीचे नवे नियम
3 ‘थर्ड क्लास अभिनय…’, द बिग बुल प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन झाला ट्रोल
Just Now!
X