News Flash

सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा बोहल्यावर!; हिच्याशी बांधणार लग्नगाठ

सिद्धार्थच्या रॉयल लूकची चर्चा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील हिट जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावरुन अनेकदा दोघही एकमेकांबदद्लचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो चांगलेचं व्हायरल झाले होते.

मात्र सिद्धार्थ पुन्हा एकदा बोहल्यावर चढत असून त्याचा या लग्नातील लूक समोर आला आहे. पहिल्या लग्नाप्रमाणेच सिद्धार्थ शेरवानी आणि डोक्यावर फेटा बांधून रॉयल लूकमध्ये मंडपात जाण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकेमध्ये सिद्धार्थ लग्न करण्यासाठी तयार झाला आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सांग तू आहेस का’ मध्ये लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. मात्र या लग्नातही मोठा ट्विस्ट दडलेला आहे. डॉ वैभवीला स्वराजपासून दूर ठेवण्यासाठी सुलू हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाटच घातला आहे. वैभवीचा जीव वाचवण्यात स्वराज यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

लग्नातला हा ट्विस्ट उत्कंठावर्धक आहेच पण स्वराज वैभवीच्या रॉयल लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराजचा लूक लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरच्या आजवरच्या लग्नसोहळ्यांमधला हा रॉयल आणि हटके लूक आहे. वेशभूषाकार संपदा महाडिकने हा खास लूक डिझाईन केला आहे.

 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकरसोबत विवाहबंधनात अडकला. आता पुन्हा एकदा मालिकेतल्या लग्नासाठी तो सज्ज झाला आहे. सिद्धार्थ साकारत असलेल्या स्वराज या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 1:26 pm

Web Title: star pravah sang tu ahes na serial wedding episode specipl sidharth chandekar wedding look kpw 89
Next Stories
1 बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!
2 करण आणखी एका स्टार किडला करणार लॉन्च; शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 शेवंता येतेय भेटीला; पुन्हा एकदा पाहायला मिळणार थरार
Just Now!
X