News Flash

‘ललित २०५’ मध्ये पाहायला मिळणार मंगळागौरीचा खेळ

भैरवीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून राजाध्यक्ष कुटुंबातील महिला मंडळ सज्ज झाल्या आहेत.

श्रावण महिना म्हणजे सणावारांची लगबग सुरु होते. यामध्ये मंगळागौरीचेही विशेष महत्त्व असते. श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. आजही ही प्रथा तितक्याच भावुकतेने केली जाते. प्रत्यक्षात रंगणारे मंगळागौरीचे खेळ आता रसिकांना छोट्या पडद्यावरही पहायला मिळणार आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘ललित २०५’ या मालिकेत प्रेक्षकांना मंगळागौरीचा अनोखा सोहळा पाहायला मिळणार आहे. भैरवीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून राजाध्यक्ष कुटुंबातील महिला मंडळ सज्ज झाल्या आहेत.

साग्रसंगीत पूजेसोबतच मंगळागौरीचे खेळ खेळत भैरवीची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. लाडक्या नातसुनेचं कौतुक पाहून सुमित्रा आजी भारावून गेलीय मात्र नीलिमा आणि गार्गी काकू अद्यापही नाराज आहेत. कानामागून आली आणि तिखट झाली असा समज या दोघींनीही करुन घेतल्याने मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या असल्या तरीही मनात मात्र अद्याप कटुताच आहे.

तिकडे भैरवीच्या मनात मात्र अद्यापही भीतीचीच भावना आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची आपण फसवणूक करत आहोत या विचारातच ती हरवून गेलीय. नील आणि भैरवीमधलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड होणार का? भैरवीची पहिली मंगळागौर निर्विघ्न पार पडणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी या मंगळागौरीमुळे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होते, तसेच मालिकेत झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 7:11 pm

Web Title: star pravah serial lalit 205 bhairavi mangalagauri program
Next Stories
1 Kasautii Zindagii Kay 2: टीममधल्या ‘या’ कलाकाराला मिळालं सर्वाधिक मानधन
2 मंदिरात गेल्यामुळे सारा अली खानवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, दिला नाव बदलण्याचा सल्ला
3 ‘टेक केअर गुड नाइट’मध्ये महेश मांजरेकर यांची खास भूमिका
Just Now!
X