मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला आहे. रमजानच्या काळात दिवसभर रोजा (उपवास) ठेवल्यानंतर संध्याकाळी खाऊन रोजा सोडला जातो त्याला इफ्तार असं म्हणतात. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘शतदा प्रेम करावे’च्या प्रॉडक्शन टीममधील काही सहकारी रोजा ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सेटवर नुकतीच इफ्तारची मेजवानी करण्यात आली.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
View this post on Instagram

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

मालिकेतील कलाकार अभिजित साटम, ज्ञानदा रामतीर्थकर, प्रिया मराठे, अंगद म्हसकर यांच्यासह मालिकेची टीम इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित होती. खजूर, फळे, समोसे अशा अनेक खाद्य पदार्थांची या पार्टीमध्ये रेलचेल होती. संध्याकाळी सगळ्या टीमनं एकत्र येऊन या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि रमजानच्या शुभेच्छाही दिल्या. कौटुंबिक वातावरण हे स्टार प्रवाहच्या मालिकांच्या सेटवरचं वैशिष्ट्य आहे. या इफ्तार मेजवानीच्या निमित्तानं त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.