X
X

स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा

READ IN APP

जाणून घ्या गणरायाच्या परीक्षेत पुंडलिक होणार का पास?

गणरायाची चाहुल एव्हाना तमाम देशवासीयांना लागली आहे. अवघ्या ३ दिवसांवर आलेला हा उत्सव घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी साजरा होईलही. मात्र आता छोट्या पडद्यावरही बाप्पांचे आगमन होणार आहे. प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनेक मालिकांमध्ये बाप्पा अवतरतात आणि त्याचा आधार घेत मालिकेची कथा पुढे जाते. त्याचप्रमाणे स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपती बाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरं आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे.

आता बाप्पाची मालिकेतील भूमिका काय असेल असा प्रश्न ही तुम्हाला पडला असेल तर यामध्ये पुंडलिकाची बाप्पा परीक्षा घेणार आहे. यात पुंडलिकाला विशेष टास्क देण्यात आला आहे. त्याला बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी करुन दाखवायच्या आहेत. यातलं पहिलं कार्य असेल ते म्हणजे गणपती बाप्पाने दिलेल्या मोजक्या तांदळापासून पुंडलिकाला २१ मोदक बनवायचे आहेत आणि तेही कुणाचीही मदत न घेता. बाप्पाने दिलेलं हे कार्य पुंडलिक पार पाडेल का? विठुराया पुंडलिकाचं सहाय्य करेल का? कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का? या साऱ्याचा उलगडा विठुमाऊलीच्या पुढील काही भागांमध्ये होणार आहे.

20
X