02 March 2021

News Flash

‘स्टार प्रवाह’ची चैत्र चाहुल

जानेवारी महिन्यात नव्या वर्षांचे धूमधडाक्यात स्वागत केले असले तरी मराठी माणूस चैत्र महिन्यातील पाडव्याची आतुरतेने वाट पाहत असतो.

| March 17, 2015 06:08 am

जानेवारी महिन्यात नव्या वर्षांचे धूमधडाक्यात स्वागत केले असले तरी मराठी माणूस चैत्र महिन्यातील पाडव्याची आतुरतेने वाट पाहत असतो. पाडव्याला दारात गुढी उभारल्याशिवाय त्याच्या नवीन वर्षांला खऱ्या अर्थाने सुरुवात होत नाही. यंदाच्या पाडव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी ‘चैत्र चाहूल २०१५ : नव्या नात्यांची नवी गुढी’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता घेऊन येणार आहे. वाहिनीच्या कलाकारांनी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात सहभाग घेतला असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाहिनीने काही नवीन पुरस्कारही सुरू केले आहेत.
ढोल-ताशाचा गजर, भोंडल्याचा सामूहिक नाद, लावणी, नाटय़संगीताचे सूर यांच्या साक्षीने नव्या वर्षांची सुरुवात करण्यासाठी वाहिनीचे लाडके कलाकार प्रेक्षकांच्या दिमतीला हजर राहणार आहेत. गतवैभवाची साक्ष देणारा भूपाळी ते भैरवीपर्यंतचा प्रवास, संस्कृती आणि प्रगतीची सांगड घालणारे कलाविष्कार येथे साजरे करण्यात येणार आहेत. याशिवाय नाटय़, टीव्ही, पत्रकारिता आणि सामाजिक बांधीलकी या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना ‘प्रवाहरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळींना एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.
या ‘चैत्रचाहूल’मध्ये अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर, जुई गडकर, प्रेक्षकांची लाडकी ‘दुर्वा’ असे वाहिनीचे प्रसिद्ध कलावंत प्रेक्षकांसमोर जाहीर कार्यक्रम सादर करताना दिसणार आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 6:08 am

Web Title: star prawahs chaitra chahul
टॅग : Television
Next Stories
1 यो यो हनी सिंग @ 32
2 ‘वो कौन थी’मध्ये क्रिकेटपटू एस. श्रीशांत, मुहूर्ताला गायले रॅप गाणे
3 केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेण्याची शक्यता?
Just Now!
X