‘अ‍ॅपल’ ही तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. अ‍ॅपलचे गॅजेट्स इतर कंपनीच्या तुलनेत अत्यंत महाग किंमतीला मिळतात. त्यामुळे अ‍ॅपलचे ‘आयफोन’, ‘मॅकबूक’, ‘आयपॅड’ असे प्रोडक्ट वापरणं हे प्रतिष्ठेचं लक्षणं समजलं जातं. अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा वापर केला जातो. परंतु हा वापर येत्या काळात थांबवावा लागणार आहे. आता निर्मात्यांना कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही.

अ‍ॅपलने असा निर्णय का घेतला?

‘स्टार वॉर्स: द लास्ट जेडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक वॅनिटी फेअर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही आवाक् करणारी माहिती दिली.
ते म्हणाले, “स्टार वॉर्समध्ये आम्ही अ‍ॅपलचे कुठलेही गॅजेट वापरले नाही. कारण अ‍ॅपलकडून आम्हाला चित्रपटात आयफोन न वापरण्याची ताकिद देण्यात आली होती. खरं तर त्यांनी आम्हाला खलनायकाच्या हातात आयफोन दिसता कामा नये, असे सांगितले होते. परंतु आमच्या चित्रपटातील कुठल्याच व्यक्तिरेखेने आयफोन वापरला नाही.” असे वॅनिटी फेअर म्हणाले.

“अ‍ॅपलचे कुठलेही गॅजेट जर चित्रपटातील खलनायकाने वापरले तर कंपनीची नकारात्मक जाहिरात होऊ शकते. त्यामुळे त्यांना ही ताकिद मिळाली होती. शिवाय येत्या काळात कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलच्या परवानगीशिवाय त्यांचे उत्पादन दाखवता येणार नाही. आणि दाखवल्यास कंपनी कायदेशीर करण्याची शक्यता आहे.” अशी माहिती वॅनिटी फेअर यांनी या मुलाखतीत दिली.