निर्माता कॅथलीन केनेडी आणि दिग्दर्शक कोलन ट्रेवेरो यांच्यात झालेल्या वादाचा थेट परिणाम ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटमालिकेवर झाला आहे. ‘स्टार वॉर्स IX’ हा अगामी चित्रपट मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु एकामागून एक येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे तो आता डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलन यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर जे.जे. अब्राम्स यांची दिग्दर्शकपदी निवड झाली आहे. ‘स्टार वार्स: द फोर्स अवेकन्स’, ‘स्टार ट्रेक’, ‘सुपर ८’, ‘मिशन इम्पॉसिबल ३’, ‘जॉय राईड’ यांसारख्या एकाहून एक सरस अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले अब्राम्स हे हॉलीवूडमधील एक अनुभवी दिग्दर्शक आहेत. चित्रीकरणाचे काम हातात घेताच त्यांनी सर्वात प्रथम लेखकांना चित्रपटाच्या पटकथेचे पुनर्लेखन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही जुन्या कलाकारांना काढून टाकले असून नव्याने कलाकारांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मते एक उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी योग्य पटकथा आणि त्यांतील व्यक्तिरेखेत चपखल बसतील असे कलाकार असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी त्यांनी चित्रपटाची पुनर्बाधणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या निर्माते त्यांच्या कामावर खूश असून वाटेल ते बदल करण्याची मुभा त्यांनी दिग्दर्शकाला दिली आहे. कॅथलीनच्या मते चित्रपट नियोजित वेळेत पूर्ण करणे हा एकमेव उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असून त्यांचा अब्राम्स यांच्या कर्तृत्वावर त्यांना पूर्ण विश्वास आहे.

 

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका