22 March 2019

News Flash

आपल्या सोयीनुसारच बोलण्यासाठी स्टारडम नाही; कंगनाचा बॉलिवूड कलाकारांना टोमणा

'देशातल्या धगधगत्या मुद्द्यांवर बोलण्यास बॉलिवूड कलाकार संकोचलेपणा दाखवतात.'

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांना टोमणा मारला आहे. देशातल्या धगधगत्या विषयांवर प्रसिद्ध कलाकार मौन का बाळगतात, अशा कलाकारांना मिळालेलं यश अर्थहीन आहे, या शब्दांत तिने टीका केली. त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसारच बोलण्यासाठी तुम्हाला स्टारडम मिळालेलं नाही असंही तिने म्हटलं.

देशातील बऱ्याच मुद्द्यांवर बोलण्यास किंवा आपली मतं मांडण्यास बॉलिवूडचे कलाकार संकोचलेपणा का दाखवतात असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर सेलिब्रिटीप्रमाणेच तुम्ही आधी देशाचे जबाबदार नागरिक आहात. त्यामुळे अशा विषयांवर कोणावरही निशाणा न साधता बोलता यावं असं मत तिने मांडलं. ‘देशातल्या धगधगत्या प्रश्नांवर जर सेलिब्रिटींनीच मौन बाळगलं तर त्यांचं कॅमेरासमोर येणं काहीच उपयोगाचं नाही. सेलिब्रिटी म्हणून त्यांना मिळालेलं यशच अर्थहीन ठरतं. तुमच्या सोईनुसारच बोलण्यासाठी स्टारडम मिळालेलं नाही,’ असं ती म्हणाली.

Video : राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या ‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

काही घटनांना हे सेलिब्रिटी सामोरं जात नाहीत, किंवा त्यांना ती परिस्थिती समजत नाही, म्हणून बरेच सहकलाकार यावर बोलणं टाळत असल्याचंही तिने म्हटलं. ‘माझ्या सहकाऱ्यांचं बोलणं मी बऱ्याचदा ऐकलं आहे. आम्हाला तर वीज किंवा पाणी यासंदर्भातील समस्या नाहीत तर आम्ही अशा विषयांवर का बोलावं? त्यांच्या अशा बोलण्याने मला फार त्रास होतो. लोकांचा असा दृष्टिकोन मला पटत नाही.’

First Published on August 10, 2018 1:19 pm

Web Title: stardom has not been bestowed upon you only to speak at your convenience kangana ranaut takes a dig at b town