09 December 2019

News Flash

२०० रुपये ते फोर्ब्जचा यादीतील कलाकार

करिअरच्या सुरुवातीला माझ्याकडे २०० रुपयेही नव्हते असे ही तो म्हणाला

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये सहभागी झाला आहे. ही यादी फोर्ब्जने प्रदर्शित केली होती. अक्षय मोजकेच चित्रपट करतो परंतु ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. सध्या अक्षय त्याचा आगमी चित्रपट ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

करिअरच्या सुरुवातीला अक्षय कुमारने अनेक प्लॉप चित्रपटांत काम केले होते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षयने त्याला करिअरमध्ये करावा लागलेला संघर्ष आणि मिळालेले यश याचा खुलासा केला आहे. सुरुवातीला त्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती. प्रत्येक वेळेस पदरात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता अक्षय प्रत्येक वेळी पुन्हा नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने उभा राहत होता.

‘मी फार वाईट दिवसही पाहिले आहेत. माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार आले जे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतात. जेव्हा माझ्या आयुष्यात वाईट काळ येतो तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या गाड्या मोजतो, माझ्या घराकडे पाहातो. कधी कधी तर मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील वस्तू पाहात बसतो. माझ्याकडे एवढं सगळं असताना मी का वाईट वाटून घ्यायचं. फायदा काय आहे या सर्व संपत्तीचा. जगात असे ही लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही करिअरच्या सुरुवातीला माझ्याकडे २०० रुपयेही नव्हते. आज माझ्याकडे सगळे काही आहे’ असे अक्षय कुमार म्हणाला.

First Published on August 14, 2019 8:00 pm

Web Title: staring carrier from 200 rupees in pocket and now in top earning actor avb 95
Just Now!
X