News Flash

नाटक-बिटक : राज्य नाटय़ स्पर्धा म्हणजे रंगकर्मीसाठी प्रयोगशाळा!

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य नाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात येते.

drama
नाटक

दिवाळी झाल्यावर राज्यभरातील रंगकर्मीची धावपळ सुरू होते ती राज्य नाटय़ स्पध्रेसाठी.. दरवर्षीप्रमाणेच यंदाही राज्य नाटय़ स्पध्रेची प्राथमिक फेरी विविध केंद्रांवर सुरू झाली आहे. दूरदर्शन, इंटरनेट या सगळय़ा माध्यमांच्या वाढलेल्या प्रभावाने स्पध्रेला किंवा एकूणच नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग कमी झाला आहे. मात्र, राज्यातील नाटय़चळवळ जिवंत ठेवण्यासाठी राज्य नाटय़ स्पर्धा महत्त्वाची आहे. ही स्पर्धा म्हणजे हौशी, प्रायोगिक नाटय़ संस्थांसाठी हक्काची प्रयोगशाळा आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य नाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात येते. राज्यातील जवळपास तीन ते चार हजार रंगकर्मीचा या स्पध्रेत सहभाग असतो. राज्य नाटय़ स्पध्रेला मोठा इतिहासही आहे. याच स्पध्रेतून अनेक रंगकर्मी घडले आहेत. महत्त्वाची प्रायोगिक, व्यावसायिक नाटके ही व्यावसायिक रंगभूमीला मिळाली आहेत. यंदा पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत १८ नाटके सादर होणार आहेत. पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरी भरत नाटय़ मंदिर येथे सुरू झाली आहे. मात्र, अलीकडे सरकारच या स्पध्रेकडे गांभीर्याने पाहात नसल्याने स्पध्रेला पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. राज्य नाटय़ स्पर्धा म्हणजे वार्षकि सोपस्कार झाल्याचा सूर लावला जातो. या पाश्र्वभूमीवर, पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या काही रंगकर्मीशी संवाद साधून त्यांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

राज्य नाटय़ स्पर्धा निश्चितपणे महत्त्वाचा उपक्रम आहे. सरकारतर्फे सातत्याने एवढी वर्षे स्पर्धा आयोजित करण्याचे हे जगातले एकमेव उदाहरण आहे. ही स्पर्धा म्हणजे रंगकर्मीसाठी खऱ्या अर्थाने प्रयोगशाळा आहे. कारण, आपल्याला हव्या त्या पद्धतीचे नाटक या स्पध्रेत करता येते. हा मंच आपण कशा पद्धतीने वापरतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे वार्षकि सोपस्कार झाला आहे, असे मला वाटत नाही, अशी भूमिका लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण यांनी मांडली. व्यावसायिक रंगभूमी किंवा चित्रपटात काम केल्यावरही मला राज्य नाटय़ स्पर्धा करावीशी वाटते, कारण माझ्या मनात असलेले सगळेच विषय व्यावसायिक रंगभूमी किंवा इतर माध्यमांत मांडणे शक्य नसते. ते विषय राज्य नाटय़ स्पध्रेत करता येऊ शकतात. या स्पध्रेने राज्यातील रंगकर्मीना एकत्र आणण्याचे काम आजवर केले आहे. म्हणून ही स्पर्धा महत्त्वाची आहे, असे सोमण यांना वाटते. त्यांच्या ‘श्यामपट’ या नाटकाचा स्पध्रेत प्रयोग झाला.

तरुण रंगकर्मी चतन्य सरदेशपांडे याने लिहिलेल्या ‘कॉफिन’ या नाटकाने पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरीचा प्रारंभ झाला. ‘राज्य नाटय़ स्पध्रेला मरगळ वगरे आली, तो केवळ वार्षकि सोपस्कार आहे, असे मला वाटत नाही. स्पध्रेला नाटय़संस्था, रंगकर्मीबरोबरच प्रेक्षकांकडूनही प्रतिसाद चांगला आहे. आज व्यावसायिक नाटकांसाठी तीनशे रुपये मोजावे लागत असताना, या स्पध्रेत नाटक पाहण्यासाठी केवळ १५ रुपये तिकीट दर आहे. राज्य नाटय़ स्पध्रेच्या निमित्ताने रंगकर्मी एकत्र येतात, काहीतरी सर्जनशील करण्याचा प्रयत्न करतात. केवळ बक्षिसासाठी नाटक करण्यापेक्षा वेगळे करून पाहतात. मला हे महत्त्वाचे वाटते,’ असे चतन्यने सांगितले.

chinmay.reporter@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 4:34 am

Web Title: state drama competition 4
Next Stories
1 पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच साराचा दिग्दर्शकांना दगा?
2 ‘कुलस्वामिनी’ मध्ये मीरा जोशीची एंट्री
3 जाहिरातीच्या सेटवर अमिताभ आणि जया बच्चन पुन्हा एकत्र
Just Now!
X