10 July 2020

News Flash

ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या मुलीने घेतला पॉर्नस्टार होण्याची निर्णय; कारण…

पैसे कमावण्यासाठी 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी झाली पॉर्नस्टार

‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणं, हे सिनेसृष्टीत करिअर करु इच्छिणाऱ्या जवळपास प्रत्येक नव्या कलाकाराचं स्वप्न असतं. परंतु ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांची मुलगी मात्र पॉर्नस्टार होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांच्या मुलीचं नाव ‘मिकेल स्पिलबर्ग’ असं आहे. ती २३ वर्षांची आहे. मिकेल १२ वर्षांची असताना स्पिलबर्ग यांनी तिला दत्तक घेतले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पॉर्नस्टार होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाली मिकेल?

“मी एकाच प्रकारचं काम करुन थकले होते. मला काहीतरी नवीन काम करायचे होते. लहानपणापासूनच मी पॉर्न चित्रपटांकडे आकर्षित झाली होते. त्यामुळे मी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मी या क्षेत्रातूनही इतरांचं समाधान करु शकते असं मला वाटतं. शिवाय पॉर्न चित्रपटसृष्टीत पैसे देखील चांगले मिळतात.” असं मिकेल द सनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

मिकेलच्या निर्णयावर ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ काय म्हणाले?

“तिला सर्वसाधारण प्रकारचे चित्रपट आवडत नाही. तिचा कल पॉर्न चित्रपटांच्या दिशेने आहे. खरं तिला जगातील सर्वात लोकप्रिय पॉर्नस्टार होण्याची इच्छा आहे. सुरुवातीला जेव्हा तिने मला हे सांगितले, तेव्हा ती थोडा आवाक् झालो. परंतु मला तिच्या स्वप्नांचा आड यायचे नाही. किंबहूना माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. जगातील कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि महत्वकांक्षा असावी लागते. आणि अशी जिद्द माझ्या मुलीमध्ये देखील आहे.” असं स्पिलबर्ग द सन या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:53 pm

Web Title: steven spielberg mikaela spielberg pornstar mppg 94
Next Stories
1 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर
2 ‘कुछ तो गड़बड़ है…’ म्हणणाऱ्या दया, फ्रेड्री आणि अभिजीतचीच फसवणूक
3 क्रिती खरबंदाचं सामान गेलं चोरीस; एअर इंडिया म्हणालं…
Just Now!
X