28 September 2020

News Flash

पॉर्नस्टार होताच दिग्दर्शकाच्या मुलीला पोलिसांनी केली अटक

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट दिग्दर्शकाच्या मुलीला अटक

स्टिव्हन स्पिलबर्ग हे जगातील सर्वात मोठे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची मुलगी मिकेल स्पिलबर्ग हिला पोलिसांनी अटक केली. मिकेलचा एक्स बॉयफ्रेंड चक पॅनको याने तिच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांखाली तिला नॅशविले पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजता अटक केली.

काय म्हणाला चक पॅनको?

“मिकेलला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. नशेच्या अवस्थेत असताना ती मला मारहाण करायची. अनेकदा मी तिचे वडिल स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्याकडे देखील तक्रार केली. परंतु त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. उलटपक्षी ते माझ्यावरच डाफरायचे. माझे तिच्यावर प्रेम होते म्हणून मी तिला सहन केले. परंतु आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. त्यामुळे मी मिकेल विरोधात पोलीस तक्रार केली.” असा आरोप चक पॅनकोने केला आहे. सध्या नॅशविले पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिकेल स्पिलबर्ग २३ वर्षांची आहे. मिकेल १२ वर्षांची असताना स्पिलबर्ग यांनी तिला दत्तक घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासून ती अमेरिकेतील नॅशविले शहरात चक सोबत राहात होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. काही दिवसांपूर्वी तिने पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न जगजाहीर केले होते. किंबहूना गेल्या वर्षभरापासून ती पॉर्न चित्रपटांमध्ये काम करत असल्याचेही तिने मान्य केले. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट दिग्दर्शकाची मुलगी पॉर्नस्टार झाली, म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 2:13 pm

Web Title: steven spielbergs daughter mikaela arrested on a domestic violence charge mppg 94
Next Stories
1 पहिल्यांदाच जेम्स बॉन्ड बोलणार मराठी
2 “ती समाजात द्वेश पसरवतेय…”; स्वरा भास्कर विरोधात कोर्टात याचिका
3 रानटी प्रवृत्तीच्या लोकांना मतदान करणारे दिल्ली हिंसाचाराला जबाबदार – प्रकाश राज
Just Now!
X