News Flash

‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’ च्या दिग्दर्शकाला आवडला हा भारतीय चित्रपट

आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी

मार्वल यूनिवर्सच्या ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’ या चित्रपटासाठी ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फिल्म दिग्दर्शक जेम्स गुन यांनी नुकतंच त्यांना एक भारतीय चित्रपट आवडला असल्याचं स्पष्ट केलंय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स गुन यांनी भारतीय चित्रपटाबाबत आवड व्यक्त केल्यामूळे भारतीय चित्रपट सृष्टीत आनंदाचं वातावरण आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही आपली आवड व्यक्त केली. दिग्दर्शक जेम्स गुन यांच्या चाहत्यांपैकी एकाने त्यांना प्रश्न केला की, “तुम्ही भारतीय चित्रपट बघता का आणि भारतीय चित्रपटाबाबत तुमचं मत काय आहे ?” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत दिग्दर्शक जेन्म गुन म्हणाले, “अनेक समीक्षकांनी भरभरून कौतूक केलेला बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा ‘लगान’ हा माझा आवडता चित्रपट आहे.”

फॅन्सनी सुचवल्या आणखी चित्रपट
दिग्दर्शक जेम्स गुन यांनी दिलेल्या या उत्तरावर त्यांच्या फॅन्सनी कमेंट करत आणखी बऱ्याच भारतीय चित्रपटांची नाव सुचवली. या नावांमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याचे ‘दंगल’, ‘तारे जमीन पर’ आणि ‘3 इडियट्स’ या चित्रपटांची नाव देखील चाहत्यांनी सुचवले.

लाल सिंह चड्डामध्ये झळकणार
आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान आमिर खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतिही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण नंतर तारखांमुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे सांगण्यात येत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 11:11 am

Web Title: story guardians of the galaxy director james gunn declared aamir khan lagaan to be his favourite indian film prp 93
Next Stories
1 “करीनासोबत लिव्हइनमध्ये राहायचंय”, सैफने बबीता कपूर यांना विचारताच त्या म्हणाल्या…
2 करोनाची लागण झाल्यानंतर अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचं निधन
3 “भावाचं नुकतच निधन होऊनही तू मजा करतेयस?”; ट्रोल करणाऱ्यांना निक्की तांबोळीने फटकारलं
Just Now!
X