23 February 2019

News Flash

Stree box office collection Day 6 : ‘स्त्री’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जाणून घ्या कमाई

या आठवड्याच्या सुरूवातीलाच 'स्त्री'च्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कथेत चंदेरी गावातील आणखी रंजक गोष्टी उलगडत जाणार आहे.

स्त्री

भय आणि विनोद यांचं अफलातून समीकरण असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सहा दिवसांत ५० कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची १०० कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशातील चंदेरी गावामध्ये या चित्रपटाची कथा रंगविण्यात आली आहे. चंदेरी गावात पूजेच्या चार दिवसांत ‘स्त्री’ नावाचे भूत येते आणि घरातील पुरुषांना गायब करते. त्यामुळे ‘स्त्री’चं संकट परतवण्यासाठी गावातील प्रत्येक घराच्या भिंतीवर ‘ओ स्त्री कल आना’ असं लिहिलं जातं. विकी (राजकुमार राव), बिट्टू (अपारशक्ती खुराणा) आणि दाना (अभिषेक बॅनर्जी) या तीन जिवलग मित्रांची गाठ ‘स्त्री’शी पडते आणि पुढे या भयपटाचा प्रवास सुरू होतो.

या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ६.८२ कोटी रुपयांची कमाई केली. सहा दिवसांत या चित्रपटानं अनपेक्षितरित्या ५० कोटींचा गल्ला जमवला आहे या आठवड्यात १०० कोटींचा गल्ला जमवण्यास हा चित्रपट यशस्वी ठरेल का हे आता पाहण्यासारखं ठरेल. लवकरच या चित्रपटाचा सिक्वलही येत आहे. ‘स्त्री’ची कथा एका रंजक वळणावर येऊन संपते, त्यामुळे पुढील कथेत चंदेरी गावातील आणखी रंजक गोष्टी उलगडत जाणार आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाच ‘स्त्री’च्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे.

First Published on September 6, 2018 10:10 am

Web Title: stree box office collection day 6