News Flash

विद्या घालत असलेले सैल कपडे निव्वळ फॅशन की आणखी काही?

गेल्या काही दिवसांपासून विद्या बालन त्यामानाने सैलसर कपडे घालत आहे. अलिकडे ती घालत असलेल्या सैल कपड्यांनी अनेकांच्या मनात औत्सुक्य निर्माण केले आहे.

| February 21, 2014 06:59 am

सध्या विद्या बालन तिच्या येऊ घातलेल्या शादी के साइड इफेक्ट्स चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. विद्या वारंवार आपण गर्भवती नसल्याचे सांगत असली तरी, अलिकडे ती घालत असलेल्या सैल कपड्यांनी अनेकांच्या मनात औत्सुक्य निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्या बालन त्यामानाने सैलसर कपडे घालत आहे. जे नक्कीच तिला चांगले दिसतात. परंतु, यामुळे अनेकांच्या मनात विद्याकडे काही गोड बातमी आहे का, याबाबतचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. द डर्टी पिक्चरची ही अभिनेत्री गुपचुपपणे मुंबईतील एका क्लिनिकला भेट देत असल्याचे देखील बोलले जात आहे. विद्याने आपण गर्भवती असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. आपल्या कामात मग्न असलेली विद्या समर शेख दिग्दर्शित आणि दिया मिर्झा निर्मित बॉबी जोसूस चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती स्त्री गुप्तहेराची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 6:59 am

Web Title: style alert why is vidya balan wearing loose fitting dresses
Next Stories
1 फर्स्ट लूकः आयुष्यमान खुरानाचा ‘दम लगाके हायशा’
2 पुनरागमनाबाबत ऐश्वर्याची नकारघंटा
3 पाहाः वरूण, इलियाना आणि ‘बेशरमी की हाइट’
Just Now!
X