सुबक निर्मित आणि कलाकारखाना प्रस्तृत ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. यात ‘दिल दोस्ती दुनियादारी’चे कलाकार अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सुव्रत जोशी दिसतील. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शुभारंभाचा प्रयोग होईल.