21 April 2019

News Flash

सुबोध म्हणतो, ती खूप गोड आहे

माझ्याहस्ते तिला बक्षीस मिळालं, तेव्हा दादा मला तुझ्यासोबत काम करायचं आहे असं ती म्हणाली होती.

तुला पाहते रे

सुबोध भावे, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तुला पाहते रे’ ही मालिका अल्पावधितच छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका ठरली. टीआरपीमध्ये देखील ही मालिका अव्वल आहे. वेगळं कथानक आणि मुख्य म्हणजे खुद्द सुबोध भावे या मालिकेत असल्यानं प्रेक्षकांनी ही मालिका अक्षरश: उचलून घेतली आहे. या मालिकेतील इशा आणि विक्रांतची जोडीदेखील लोकप्रिय ठरत आहे.

अल्पवाधीत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवण्यास यशस्वी झालेल्या गायत्रीचं म्हणजेच इशाचं सुबोधनं एका मुलाखतीत पुन्हा एकदा कौतुक केलं. गायत्री खरंच खूप गोडं मुलगी आहे. ती तिसरी चौथीत असताना माझ्याहस्ते तिला बक्षीस मिळालं. तेव्हा दादा मला तुझ्यासोबत काम करायचं आहे असं ती म्हणाली होती. तू आधी शिकून मोठी हो, मन लावून अभ्यास कर मग या क्षेत्रात ये असं मी तिला म्हणालो आणि तिनं तसं केलंही. तिची माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली, असं म्हणत सुबोधनं जुन्या आठवणीला पुन्हा उजाळा दिला.

तसेच वयानं लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत काम करताना आलेला अनुभवही सुबोधनं शेअर केला. ती पहिल्यादिवशी सेटवर फोटो दाखवायला आली. मला विश्वासच बसत नव्हता. तिचं माझ्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तिला पाहून स्वप्नांवरचा विश्वास वाढला. सुरूवातीला काम करताना अवघडलेपणा आला पण आता मात्र तो दूर झाला आहे.’ असं म्हणत सुबोधनं गायत्रीसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या या मालिकेनं नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अॅवॉर्ड्समध्ये नऊ पुरस्कार पटकावले आहेत.

First Published on November 9, 2018 4:31 pm

Web Title: subodh bhave praise tula pahate re fame gayatri datar and share experience working with her