News Flash

“आजच्या दिवशी तिने मला ‘हो” म्हणलं”; सुबोध भावेची पोस्ट चर्चेत

सुबोध भावेची फिल्मी लव्ह स्टोरी

अभिनेता दिग्दर्शक सुबोधने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. एकाच धाडणीच्या भूमिका न करता वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातलीय.

सुबोधने पडद्यावर ज्याप्रमाणे खआस भूमिका साकारल्या आहेत. तितकीत खास सुबोधची लव्ह स्टोरी आहे. सुबोधने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. पत्नी मंजिरीसोबत हा फोटो शेअर करत सुबोधने एक हटके कॅप्शन दिलंय.”आजच्या दिवशी तिने मला ‘हो” म्हणलं” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय. अभिनेता स्वप्निल जोशी, सुयश टिळक तसचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर यांच्यासंह अनेक कलाकरांनी कमेंट करत सुबोध-मंजिरीच्या या फोटाला अनेकांनी पसंती दिलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

हा फोटो पाहून सुबोधच्या अनेक चाहत्यांना त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे असा समज झाला. मात्र सुबोधची पत्नी मंजिरीने देखील तिच्या इन्स्टा अकाऊंटला काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नसल्याचं तिने स्पष्ट केलंय. सुबोध सोबतचे क्यूट फोटो शेअर करत मंजिरीने कॅप्शन दिलंय. यात ती म्हणाली, ” गुन्ह्यांमधले सोबती(Partners in crime), वाढदिवस… होय… लग्नाचा….नाही..प्रेम आणि वचनबद्धतेची 30 वर्ष…खरी पार्टनरशीप सुरू होण्याच्या संपूर्ण 10 वर्ष आधी.” असं कॅप्शन मंजिरीने दिलंय.
एकंदरच सुबोधने मंजिरीला प्रपोज केल्यानंतर सुरु झालेल्या नात्याला आज 30 वर्ष पूर्ण झाली असून दोघंही या खास दिवसाच्या आठवणीत रमले आहेत.

वाचा : राहुल वैद्यचं फेसबुक अकाऊंट हॅक ; ‘ते’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Subodh Bhave (@manjirisbhave)

फिल्मी लव्ह स्टोरी
सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीचा उलगडा केलाय. अगदी कमी वयातच दोघांचं नातं बहरलं होतं. सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. साधारण 1991 या सालातली ही गोष्ट आहे. यानंतर 10 वीला असतानाच सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं.तर मंजिरीने देखील हटके अंदाजात सुबोधला उत्तर दिलं. एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी सुबोधला म्हणाले की बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज..त्यानंतर मी त्यावेळेला पुलावर गेले.. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं”

1991 मध्ये सुबोध आणि मंजिरीच्या सुरू झालेल्या प्रेमाच्या नात्याला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2001 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 5:05 pm

Web Title: subodh bhave share photo with wife said on this day she said yes to me kpw 89
Next Stories
1 गोव्यात १० मे पर्यंत शूटिंग बंद , ‘या’ मालिकाचं चित्रीकरण पुन्हा रखडलं!
2 गायक अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती बिघडली; कोलकत्ताच्या रूग्णालयात दाखल
3 सोनू निगमने विना मास्क केलं रक्तदान ; “कोणीतरी यांना मास्क दान करा…!”
Just Now!
X