28 January 2020

News Flash

सुबोध भावे आणि भरत जाधव पुन्हा एकत्र, करणार हा चित्रपट

हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

एकानंतर एक दमदार चित्रपट, मालिकांमधून मराठी अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यासोबतच सुबोध भावेच्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेनेसुद्धा छोटा पडदा गाजवला होता. आता सुबोध भावे आणखी एका नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोध भावेच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘आप्पा आणि बाप्पा’ असे आहे. या चित्रपटात सुबोध भावेसह अभिनेता भरत जाधव दिसणार आहे. सुबोधने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये सुबोधने गणपती बाप्पाला ज्या प्रकारे डोक्यावर उचलून घेतात त्या प्रकारे भरत जाधवला घेतले आहे. दरम्यान सुबोध एकदम अनोख्या अंदाजामध्ये दिसत आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

हे पोस्टर शेअर करत ‘आप्पा येतोय बाप्पा सोबत! ११ ऑक्टोबरला तुम्हाला भेटायला…’ असे कॅप्शन सुबोधने दिले होते. ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाची निर्मिती गरीमा धीर आणि जलज धीर करत आहेत. चित्रपटाची कथा अरविंद जगताप आणि अश्वनि धीर यांची आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे आणि भरत जाधव यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी वाचा : शाहरुखने या चित्रपटात दिला होता पहिला बोल्ड सीन

भरत जाधव आणि सुबोधल भावे यांनी २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उलाढाल’ आणि  २०१० मधील ‘लाडी गुडी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आता ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

First Published on September 11, 2019 4:40 pm

Web Title: subodh bhave upcoming movie aapa and bappa avb 95
Next Stories
1 शाहरुखने ‘या’ चित्रपटात दिला होता पहिला बोल्ड सीन
2 ‘कूली नंबर १’च्या सेटवर लागली आग
3 Video : ‘हिरकणी’मधील शिवराज्याभिषेकावरील गाण्यात कलाकारांची फौज
Just Now!
X