05 April 2020

News Flash

सुबोध भावे साकारणार शरद पवार?

शरद पवारांची घेतली भेट

सुबोध भावे, शरद पवार

मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायची इच्छा बोलून दाखवली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुबोध भावेने शरद पवारांची भेट घेतली. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला. सुबोधने आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले.

सुबोधने याआधीही पवारांची भूमिका साकारायची इच्छा व्यक्त केली होती. ‘मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही,’ असं तो म्हणाला होता. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

View this post on Instagram

पवारसाहेबांची भूमिका साकारण्याची इच्छा सुबोध भावे यांनी याआधीच व्यक्त केली आहे. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे उद्गार @subodhbhave यांनी काढले आहेत. संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे (@subodhbhave ) यांनी आज आदरणीय खा. शरद पवारसाहेबांची सौजन्य भेट घेतली. @pawarspeaks #maharashtra #sharadpawar #mahavikasaghadi #ncp_maharashtra_updates #king #politics #ncp #subodhbhave

A post shared by Nationalist Congress Party (@ncp_maharashtra_updates) on

सुबोध सध्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो  ‘AB आणि CD’ या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबक काम करणार आहे. सोशल मीडियावर बिग बींसोबतचा फोटो शेअर करत सुबोधने स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 1:31 pm

Web Title: subodh bhave wants to play role of sharad pawar ssv 92
Next Stories
1 वरुण धवनचा आणखी एक फ्लॉप चित्रपट येतोय; अभिनेत्याने उडवली खिल्ली
2 मोदींनंतर आता रजनीकांत Man Vs Wild मध्ये झळकणार
3 Video : …अन् त्या विषयावर बोलताना दिया मिर्झाला अश्रू अनावर
Just Now!
X