News Flash

सुबोध भावेने साकारलेला संभाजी महाराजांचा हा लूक पाहिलात का?

गंभीर मुद्रेतला संभाजी महाराजांच्या भूमिकेतील सुबोधचा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे

सुबोध भावे

मराठी सिनेमातील एक नावाजलेले नाव म्हणजे अभिनेता सुबोध भावे. सध्या सोशल मडियाबरोबरच चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती सुबोधच्या ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आगामी सिनेमाची. या सिनेमाच्या दोन्ही ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमुळे आणि बड्या कलाकारांची मांदीयाळी असल्याने या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सुबोधने याच सिनेमाच्या निमित्ताने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील एक फोटो ट्विट केला आहे.

सुबोधने ट्विट केलेल्या फोटोमध्ये कपाळी चंद्रकोर, गळ्यात मोत्यांच्या माळा आणि गडद लाल रंगाचा सदरा अशी वेशभूषा असलेला संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना सुबोध म्हणतो, “डॉ. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील ‘छत्रपती संभाजी महाराजांची’ भूमिका ही त्यांची अजरामर भूमिका. तो प्रसंग चित्रपटात साकारण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी (करताना). छत्रपती संभाजी महाराजांच्या आशिर्वादानेच हे आव्हान पेलणं शक्य झालं.”

गंभीर मुद्रेतला संभाजी महाराजांच्या भूमिकेतील सुबोधचा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे हे ट्विटखाली आलेल्या कमेन्टमधूनच दिसून येते.

भूमिका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवाल

Next Stories
1 MeToo : करण जोहर, शबाना आझमी आता गप्प का?, कंगनाचा सवाल
2 #MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय
3 #MeToo : तनुश्रीला फोटोशूट करणं पडलं महागात
Just Now!
X