अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री, गायिका सुचित्रा कृष्णमुर्ती हिने प्रतिक्रिया दिली. केवळ महिला कलाकारांनाच चौकशीसाठी का बोलावलं जातंय? असा सवाल तिने एनसीबीला केला आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

सुचित्रा कृष्णमुर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. “सध्याच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना क्या माल है? असं म्हटलं जातं. आता त्याच अभिनेत्री खऱ्या आयुष्यात माल है क्या? म्हणतायेत. सिनेक्षेत्रातील कार्यपद्धती व संस्कृतीच बदलून गेली आहे. पण मला अजूनही या गोष्टींचं आश्चर्य वाटतं की कोणत्याही पुरूष कलाकाराला अद्याप एनसीबीने आपल्या कार्यालयात चौकशीसाठी का बोलावलं नाही? या ड्रग्ज प्रकरणात केवळ महिला कलाकारांचीच नावं समोर का येत आहेत?” अशा आशयाचं ट्विट सुचित्राने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.