24 September 2020

News Flash

‘करण जोहरची नवी खास मैत्री असल्यामुळे तिला..’,सुचित्रा कृष्णमूर्तिचा नेहा धूपियावर निशाणा

नेहाने देखील उत्तर देत सुनावले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. काही कलाकारांनी या विरोधात वक्तव्य करत आवाज उठवला तर काहींनी यामध्ये गैर नसल्याचे म्हणत पाठींबा दिला. अशातच अभिनेत्री नेहा धूपिया आणि सुचित्रा कृष्णमूर्ति या दोघींमध्ये घराणेशाही या विषयावरुन ट्विटर वॉर सुरु आहे.

सुचित्राने ट्विट करत बॉलिवूडमध्ये चमचागिरी ही मोठी समस्या आहे असे म्हटले. तसेच नेहा धूपिया ही करण जोहरची खास मैत्रीण असल्यामुळे तिच्यावर निशाणा देखील साधला आहे. ‘मित्रांनो बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा चमचागिरी विरोधात आवज उठवण्याची गरज आहे. मला कळत नाही नेहा धूपियाला अचानक इतके टॉक शो कसे मिळाले. याचे कारण एकच आहे ती करण जोहरची नविन खास मैत्रीण आहे आणि फेमिना मिस इंडिया २००२ आहे. ती स्टार किडही नाही’ असे सुचित्राने ट्विटमध्ये म्हटले असून नेहावर निशाणा साधला.

सुचित्राच्या या ट्विटवर नेहा धूपियाने देखील उत्तर दिले आहे. नमस्कार मॅडम, गेल्या कित्येक वर्षांची मैत्री तोडणारे ट्विट मी वाचले. ज्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती नाही त्याविषयी बोलणे बोलू नका. मी स्वत:च्या हिमतीवर सगळं काही मिळवले आहे त्यामुळे मला माझा अभिमान आहे. मी एक मुलगी, पत्नी आणि आई असल्याचा मला अभिमान आहे. आणि ज्या महिला या सर्व गोष्टी समजून घेतात त्यांचा मी आदर करते या आशयाचे नेहाने ट्विट केले असून सुचित्रा यांना म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 8:50 am

Web Title: suchitra krishnamoorthi slams neha dhupia for chamchagiri in bollywood avb 95
Next Stories
1 ‘ओटीटी आणि चित्रपटगृहे दोन्हींचे अस्तित्व महत्वाचे’
2 नावातच सारे आहे!
3 ज्येष्ठांचा  पुन : प्रवेश
Just Now!
X