गत काळातील अभिनेत्री सुचित्रा सेन यांची तब्येत जास्त खालावली आहे. त्या बेशुध्दही आहेत आणि त्यांना सध्या कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. ८२ वर्षीय सुचित्रा सेन यांची तब्येत काही दिवसांपासून खराब झाली होती. त्यांना २३ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरीही करण्यात आली. कोलकाताच्या ब्लू वैली हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विशेषज्ञ डॉ. सुब्रता मित्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, सुचित्रा यांना आईटीयू विभागात (इंटेसिव ट्रीटमेंट यूनिट) दाखल करण्यात आले आहे.
आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी सुचित्रा यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षायंत्रणा वाढविण्यात आली आहे.