‘कॉमेडीचा बादशहा’ कपिल शर्मा त्याच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. प्रेयसी गिन्नी छत्रथशी तो लग्नगाठ बांधणार असून देशभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमृतसरमध्ये लग्नाचा मंडप सजला असून सेलिब्रिटीसुद्धा पोहोचले आहेत. कपिल-गिन्नीला प्रख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

ओडिशा इथल्या पूरीच्या समुद्रकिनाऱ्यावर भव्य वाळू शिल्प साकारत त्यावर ‘द कपिल शर्मा शो’ लिहून पटनाईक यांनी कपिल-गिन्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा : १२… १२… १२… वाढदिवशीच रजनीकांतने केला हा अनोखा विक्रम

मंगळवारी ११ डिसेंबर रोजी जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगला. तर आज (१२ डिसेंबर) कपिल आणि गिन्नी विवाहबंधनात अडकणार आहेत. कपिल आणि गिन्नीनं १४ डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये एका रिसेप्शन पार्टीचंही आयोजन केलं आहे. कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईमध्ये देखील एक पार्टी आयोजित केली असून २४ डिसेंबरला ही पार्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कपिलच्या लग्नानंतर त्याचा बहुप्रतिक्षित ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये कपिलसोबत कृष्णा अभिषेक, सिमोना, भारतीदेखील दिसणार आहे.