भारतीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे यांचे वाळूशिल्प  तयार करून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. कान चित्रपट महोत्सवात सत्यजित रे आणि ताजमहालचे शिल्प त्यांनी केले आहे. यंदाचा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फ्रान्स येथे होत आहे.
६७व्या कान चित्रपट महोत्सवादरम्यान काल पटनायक यांनी सत्यजित रे यांना श्रद्धांजली देण्यासाठी झमेनहोफ समुद्रकिना-यावर हे शिल्प केले. फ्रान्स येथील भारतीय दुतावासाने मूळच्या ओडिशाच्या सुदर्शन यांना महोत्सवादरम्यान वाळूशिल्प करण्यासाठी बोलावले होते. फ्रान्स येथील भारतीय राजदूताद्वारे या शिल्पाचे उदघाटन करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी, कमल हसन आणि अनेक सेलिब्रेटी यावेळी उपस्थित होते.

पद्मश्री पुरस्कार विजेता सुदर्शन पटनाईक यांनी सहा फूट उंचीचे ताजमहालचे शिल्पही केले असून याद्वारे ‘अतुलनीय भारत’ असा संदेश दिला आहे.