मिमिक्री आर्टिस्ट , गायक सुदेश भोसले आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्रीसाठी सुदेश भोसले यांना खासकरुन ओळखले जाते. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सुदेश यांनी बिग बींविषयी अनेक गमतीदार आठवणी सांगितल्या आहेत. यामध्येच अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बिग बींविषयी एक खुलासा केला आहे. ‘बिग बींमुळे मी नैराश्यात गेलो होतो’, असं ते म्हणाले आहेत.

“माझ्या करिअरची सुरुवात एक पेंटर म्हणून झाली होती. त्यावेळी आतासारखे डिजिटल प्रिंटेड पोस्टर नसायचे. त्यामुळे मी वडिलांसोबत स्टुडिओमध्ये जाऊन पोस्टर पेंट करायचो. त्यावेळी आम्ही प्रेम नगर, जूली, श्रीमान श्रीमति , प्रेम, स्वयंवर, दोस्ती, स्वर्ग नर्क अशा अनेक राजश्री प्रोडक्शनसाठी काम केलं होतं. एकदा मी मुक्कदर का सिकंदर हा चित्रपट पाहिला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन या चित्रपटातील संवाद ऐकवले. विशेष म्हणजे माझा आवाज त्यावेळी हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्यासारखा येत असल्याचं माझ्या मित्रांनी सांगितलं. त्यानंतर मग माझा आवाज त्यांनी रेकॉर्ड केला. इतकंच नाही तर दिलीप कुमार, मिथून, असरानी, जीवन , राजकुमार, शत्रूघ्न सिन्हा अशा अनेक अभिनेत्यांचा आवाज मी काढला. पण, बिग बींचा आवाज साऱ्यांनाच विशेष आवडला”, असं सुदेश भोसले म्हणाले.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Rishi Sunak Trolled For Shoes
ऋषी सुनक यांनी ‘अडिडास’चे स्नीकर्स घातले नी सोशल मीडियावर गजहब झाला; मागावी लागली माफी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

पुढे ते म्हणतात, “त्यावेळी बिग बींसारखा आवाज काढणारा मी पहिला व्हॉइस आर्टिस्ट होतो. मात्र, ज्या आवाजामुळे मला नवीन ओळख, प्रसिद्धी मिळाली त्याच व्यक्तीमुळे मी नैराश्यात गेलो होतो. कारण मी जिथे कुठे जायचो तिथे मला अमिताभ यांच्याच आवाजात गाणी म्हणण्यास सांगण्यात यायचं. खरं तर मी अन्य आवाजातही गाणी गाऊ शकत होतो. मात्र, मी बिग बीच्या आवाजातील गाणं सोडून अन्य कोणत्या आवाजात गाणं गायलं की मला रिजेक्ट करण्यात यायचं. त्यामुळे मला माझी करिअरची चिंता सतावू लागली होती. मी नैराश्यात गेलो होतो. परंतु, काही काळ गेल्यानंतर मी यातून बाहेर पडलो आणि मला जो आवाज दिलाय तो दैवी शक्ती आहे असं मानून त्याच दिशेने काम करु लागलो”.

दरम्यान, सुदेश भोसले हे कलाविश्वातील नावाजलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी किशोर कुमार यांच्याबरोबरदेखील गाणी गायली आहेत. तर संजीव कुमारसाठी आवाज डब केला आहे. परंतु पण १९९१ मध्ये ‘हम’ या चित्रपटात बच्चनसाठी ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्यानंतर त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली.