प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो चटर्जीला बलात्काराच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. सुदीप्तोवर त्याच्याच नाट्यगटातील एका विद्यार्थ्याने बलात्काराचा आरोप केला होता.

“सुदीप्तोने अभिनय शिकवण्याच्या बाहाण्याने माझ्यावर वारंवार बलात्कार केला आहे. मी अनेकदा त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मला माझे करिअर संपवून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी शांत बसले होते.” असे आरोप पीडित तरुणीने फेसबुकच्या माध्यमातून सुदीप्तोवर केले होते. त्यानंतर झालेल्या पोलिस चौकशीत हे आरोप सिद्ध झाले. परिणामी पोलिसांनी आता सुदीप्तो चटर्जीला गजाआड पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदिप्तोच्या आणखी दोन विद्यार्थांनींनी त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. परंतु त्या प्रकरणावर पोलिसांची चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीदरम्यान सुदिप्तोने बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. मात्र त्याने त्या तरुणीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्याचे मान्य केले. त्याच्या मते दोघांच्या संमतीने हे संबंध प्रस्तापित झाले होते. परंतु सुदिप्तोने पीडित तरुणीला केलेल्या काही मोबाईल मेसेजच्या आधारावर पोलिसांना त्याला अटक केली आहे.