News Flash

‘बिग बॉस’मुळे माझं आर्थिक नुकसान- अनुप जलोटा

'बिग बॉस'शोमध्ये सहभाग घेतल्यापासून मला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे असं अनुप एका मुलाखतीत म्हणाले.

जसलीन- अनुप जलोटा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटा एकामागोमाग एक गौप्यस्फोट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून मला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करेपर्यंत सारं काही सुरळीत सुरू होतं मात्र त्या घरात प्रवेश केल्यानंतर मला तोटा सहन करावा लागत आहे असं अनुप यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अनुप जलोटा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जसलीन आणि आपलं नातं हे प्रियकर प्रेयसीचं नसून ते गुरू शिष्याचं आहे. तिचं कन्यादानही मीच करणार आहे यासाठी मी तिच्या वडिलांकडून परवानगीही मागीतली आहे असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं. जसलीनला माझ्या प्रसिद्धीचा वापर करायचा होता तो तिनं केला. ‘बिग बॉस’नेच आम्हाला घरात प्रियकर प्रेयसीचं म्हणूनच प्रवेश करायला सांगितलं असंही ते म्हणाले.

नुकतेच अनुप ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभागी झाले होते, या शोदरम्यान त्यानं घरात प्रवेश केल्यापासून आर्थिक संकट उभं राहिल्याचा दावा केला. तसेच मी भजनं गातो म्हणून मी संत नाही मला संत मानू नका मी एक सामान्य माणूस आहे त्यामुळे सामान्य माणसांसारखचं माझ्याकडे बघा असंही ते प्रेक्षकांना म्हणाले.

मात्र दुसरीकडे ‘बिग बॉस’च्या घरात असलेल्या जसलीननं अनुप यांचे आरोप फेटाळुन लावले आहेत. मी आणि अनुप गेल्या साडेतीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत त्यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर जगाला खोटं का सांगितलं हेच मला कळत नाही आहे असं म्हणत तिनं नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 9:58 am

Web Title: suffered financial losses after entering the bigg boss 12 anup jalota claims
Next Stories
1 रणवीरच्या घरी लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ
2 संजय लीला भन्साळी ‘करण-अर्जुन’ला एकत्र आणणार ?
3 साराच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला विरोध; पुजाऱ्यांकडून बंदीची मागणी
Just Now!
X