सुहाना खान हे नाव आताच्या घडीला कोणासाठीही नवीन नसेल. अभिनेता शाहरुख खानची लेक असलेली सुहाना सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे अनेका ती प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. अलिकडेच सुहानाने तिचा नवीन फोटो शेअर केला असून हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सुहानाने सोशल मीडियावर कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला की त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागते. यामध्येच तिने पांढऱ्या रंगाच्या लॉन्ग स्कर्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सुंदर दिसण्यासोबतच बिंधास्त अंदाजात दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने माझा स्कर्टमधील फोटो पाहा, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

आणखी वाचा- मैत्रीणीसोबचा फोटो शेअर करत शाहरुखची मुलगी म्हणाली, ‘म्हणून माझं डोकं…’

दरम्यान, सुहाना बऱ्याच वेळा तिच्या ड्रेसिंगसेन्स किंवा कपड्यांवरुन ट्रोल होत असते. यापूर्वी अनेकदा तिला पाश्चिमात्य कपड्यांवर काहींनी ट्रोल केलं आहे. मात्र, यावेळी सुहानाने शेअर केलेल्या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत असून काहींनी तिचं कौतुक केलं आहे.