News Flash

‘वोग’च्या कव्हरवर झळकण्यासाठी सज्ज झाली ‘ही’ स्टारकिड

काही दिवसापूर्वी जान्हवी कपूरने एका मासिकासाठी फोटोशुट केल्याचं पाहायला मिळालं होतं.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लाडकी लेक सतत चर्चेत राहत असून तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील जास्त असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे सुहानाने लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र सुहाना सध्या तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. त्यामुळे तिच्या चंदेरी दुनियेमधील पदार्पणाबाबत आता काही चर्चा करु नका असं शाहरुख खानने यापूर्वी म्हटलं होतं. तरीदेखील सुहानाचं हळूहळू पदार्पण होऊ लागलं आहे.

काही दिवसापूर्वी जान्हवी कपूरने एका मासिकासाठी फोटोशुट केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवत सुहानाने फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सुहानाच्या या फोटोशुटमुळे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

सुहाना

सुहानाने नुकतचं ‘वोग’ या मासिकासाठी फोटोशूट केलं असून हे मासिक ऑगस्ट महिन्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये वोगच्या मासिकावर सुहाना झळकून येणार आहे. या फोटोसाठी सुहानाने काही स्टनिंग पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सुहाना खान

दरम्यान, या फोटोशूटमुळे सुहाना चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुपरस्टार झाल्याचं दिसून येत आहे. मात्र तरीदेखील जान्हवी कपूर, सारा अली खान यांच्यासारखी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची सुहानाला घाई नसल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 5:28 pm

Web Title: suhana khan magazine cover photo shoots
Next Stories
1 …अन् कॅन्सर झाल्याचं सोनालीला कळलं
2 अरेरे! ट्रेलरऐवजी चुकून संपूर्ण चित्रपटच युट्यूबवर अपलोड केला आणि…
3 ‘या’ सेलिब्रिटींनी केली कॅन्सरवर यशस्वीरित्या मात
Just Now!
X