News Flash

PHOTO: बाबांसारखाच अब्रामही मुलींमध्ये प्रसिद्ध

अब्राम खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतो.

शाहरुख मुलगा अब्रामसोबत

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांची मुलेही सोशल मीडियावर किंग आहेत. शाहरुखचा लहान मुलगा अब्राम खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतो. अब्रामचा बहीण सुहानाच्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत अब्राम, सुहानाच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. हा फोटो फ्युचर डॉट बॉलिवूड या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. याशिवाय सुहानाचाही एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अब्रामच्या ट्री हाऊसचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अब्राम त्याच्या या सुरेखशा ट्री हाऊसमध्ये खेळताना दिसत होता. साबु सिरीलने अब्रामच्या या ट्री हाऊसचे डिझाईन केले आहे. बालपणीच्या गप्पांमध्ये आणि खेळांमध्ये ट्री हाऊस सर्वांनाच हवेहवेसे असते. त्यामुळे अब्रामचे हे ट्री हाऊस तुम्हालाही आवडेल असेच आहे.

तिन्ही मुलांमध्ये अब्रामचेच सर्वात जास्त लाड होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच शाहरुख आणि गौरीने सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले होते. अब्रामचे ज्या प्रकारे लाड होत आहेत तितके लाड सुहाना आणि आर्यनचेही झाले नाहीत अशी भावना गौरीने व्यक्त केली होती. अब्रामच्या याच प्रेमापोटी त्याच्यासाठी आता एक खास ट्री हाऊस बनवून घेण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:12 pm

Web Title: suhana khan posed with little brother abram and her friends
Next Stories
1 जर जलीकट्टूवर बंदी घातली तर बिर्याणीवरही घाला- कमल हसन
2 ‘बाहुबली’ चित्रपटात कलाकारांच्या मानधनापेक्षाही या गोष्टीसाठी झाला होता सर्वाधिक खर्च
3 दीपिका,कतरिनासोबत अडकल्यास मी जीव देईन- करिना
Just Now!
X