बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. सुहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सुहाना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे तिच्या चाहत्यांच्या लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाच्या बोल्ड लूकची चर्चा सुरु आहे. तसेच या फोटोमध्ये तिच्यासोबत असणारा मुलगा कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नुकताच सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या मित्र-मैत्रीणींसोबत दिसत आहे. पण सर्वात जास्त चर्चा या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाच्या रंगल्या आहेत. हा मिस्ट्री बॉय कोण आहे ज्याच्यासोबत सुहाना पोज देत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण तो मुलगा कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या फोटोमध्ये सुहाना अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. तिने फिकट आकाशी रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये सुहाना अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचा हा लूक देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच सुहानाच्या नाइट पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो चर्चेत होते. त्यावेळी देखील सुहानाचा बोल्ड लूक चर्चेत होता. सुहाना सध्या तिचे शिक्षण घेत असून ती न्यूयॉर्कमध्ये आहे. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते.