22 January 2019

News Flash

सुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

आयपीएल सामन्याला तिच्या उपस्थितीची सोशल मीडियावर चर्चा असतानाच आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे यावेळी तिने घातलेले शूज.

सुहाना खान, शाहरुख खान

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान या साऱ्याबद्दल कमालीचं कुतूहलही पाहायला मिळतं. नुकत्याच एका आयपीएल सामन्याला हजेरी लावलेल्या सुहानाने अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या उपस्थितीची सोशल मीडियावर चर्चा असतानाच आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे यावेळी तिने घातलेले शूज.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला सुहानाने हजेरी लावली होती. यावेळी कॅज्युअल लूकमध्ये असलेल्या सुहानाने ज्युजेपे जनौती डिझाइन शूज घातले होते. ज्युजेपे जनौती हा प्रसिद्ध इटालियन फॅशन आणि फुटवेअर डिझायनर असून त्याच्या या ब्रँडचे फुटवेअर अत्यंत महागडे असतात. या शूजची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! इटालियन ब्रँडच्या वेबसाइटवर त्याची किंमत ९९५ डॉलर इतकी आहे. म्हणजेच जवळपास ६५ हजार रुपयांचे ते शूज आहेत.

Bigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ

याआधीही सुहानाने परिधान केलेल्या टॅन्जेरिन ड्रेसची किंमत जाणून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एका हॉटेलच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने सुहानाने घातलेल्या त्या ड्रेसची किंमत जवळपास ६० हजार रुपये असल्याचं कळत होतं. किंग खान आणि त्याच्या मुलांच्या उच्चभ्रू राहणीमानाचा अंदाज यातून सहज लावता येत आहे. सुहाना सध्या बॉलिवूड पदार्पणसाठी जोरदार तयारी करत असून सोशल मीडियावरील तिची चर्चा पाहता पदार्पणापूर्वीच आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात ती यशस्वी होत आहे असं म्हणायला हरकत नाही.

 

First Published on April 16, 2018 2:59 pm

Web Title: suhana khan stylish shoes cost will make your jaws drop