बॉलिवूडमध्ये आता अनेक स्टार किड पदार्पण करत आहेत. जान्हवी, सारा यांसारख्या स्टारकिडनं बॉलिवूडचा रस्ता धरल्यानंतर शाहरुखची लाडकी लेक तरी कशी मागे राहिल. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

नुकतीच सुहाना वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली. खरं तर या फोटोशूटनंतर सुहाना मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाली. सुहाना अभिनय किंवा मॉडेलिंग क्षेत्रात अजूनही यायची आहे असं असताना वोगच्या मुखपृष्ठावर झळकण्याचं कारण काय असं विचारत अनेकांनी तिला ट्रोल केलं. या ट्रोलिंगलाही तिनं सडेतोड उत्तर दिलं. पण. या फोटोशूटनंतर सुहाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

काही खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार कदाचित करण जोहर सुहानाला आपल्या चित्रपटात लाँच करू शकतो. करण आणि शाहरुख यांच्यातील मैत्रीचं नातं खूपच घट्ट आहे. खुद्द करण शाहरुखच्या कुटुंबियांना आपल्याच कुटुंबाचा भाग समजतो त्यामुळे करण सुहानाला चित्रपटात लाँच करण्याचा विचार करत असल्याचं समजत आहे. अद्यापही याची अधिकृत घोषणा झाली नाही मात्र लवकरच याची अधिकृत घोषणा होईल असंही म्हटलं जात आहे.