News Flash

सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण, ‘बिग बॉस’ स्पर्धकाशी करणार रोमान्स?

'स्टुडंट ऑफ द इअर ३'मध्ये लागली वर्णी?

सुहाना खान

गेल्या काही दिवसांपासून एका स्टारकिडच्या बॉलिवूड पदार्पणाची जोरदार चर्चा आहे. ही स्टारकिड आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेनंतर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा सुहानालासुद्धा बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नव्हे तर ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ या चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून यामध्ये ती ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वातील बहुचर्चित स्पर्धकासोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बिग बॉस १३’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला स्पर्धक असिम रियाझ सुहानासोबत काम करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे असिमसाठी ही सर्वांत मोठी संधी आहे. मात्र करण जोहरने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून प्रत्येक वेळी नवीन चेहरे बॉलिवूडला मिळाले. पहिल्या चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केलं होतं. तर दुसऱ्या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने करिअरला सुरुवात केली. आता तिसऱ्या चित्रपटातून सुहाना आणि असिमच्या करिअरला सुरुवात होणार असल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 5:43 pm

Web Title: suhana khan to romance this bigg boss contestant in her debut film reports ssv 92
Next Stories
1 Video : विधू विनोद चोप्रांचं बाळासाहेब ठाकरेंविषयी महत्त्वाचं विधान
2 Video : काही चुकलं असेल तर माफ करा…पत्रकार परिषदेतच डॉ. अमोल कोल्हेंना अश्रू अनावर
3 ‘हे’ आहेत सचिन पिळगावकरांचे आवडते मुख्यमंत्री
Just Now!
X