सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. त्यामुळेच सतत चर्चेत राहणारी सुहाना इन्स्टाग्राममुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सुहाना अनेकवेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. त्यामुळे ती लहान लहान अपडेटही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. तिच्या याच सवयीमुळे तिचा फॅनफॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या सुहानाने तिच्या बेस्टफ्रेंडसोबतचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला असून हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

@suhanakhan2 with a friend . . . #suhanakhan #suhana #shanayakapoor #ananyapandey

A post shared by Suhana (@suhanakhan143) on

बॉलिवूडमधील अनेक स्टारकिडची एकमेकांबरोबर चांगली मैत्री आहे. त्यामुळे सुहानाचादेखील या इडस्ट्रीमध्ये कोणी ना कोणी बेस्टफ्रेंड असणारच. याच बेस्टफ्रेंडसोबतचा एक फोटो सुहानाने शेअर केला असून तिचा हा बेस्टफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आहे.

अगस्त्य हा बिग बींची  मुलगी श्वेता नंदा हिचा मुलगा असून तो लंडनमध्ये शिकत आहे. मात्र सध्या तो मुंबईमध्ये आला असून सुहानाबरोबर सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. या दरम्यानचाच एक फोटो सुहानाने शेअर केला आहे. हा फोटो सुहानाने फिल्टर केला असून त्याला काही इफेक्टही दिल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा फोटो  चांगलाच व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.   सुहानाने यापूर्वीही अगस्त्यसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यातूनच ती आणि अगस्त्य एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं दिसून येतं.