18 January 2019

News Flash

Sui Dhaaga first look: सर्वसामान्य जोडप्याच्या रुपात वरुण-अनुष्का

'ममता और मौजी आ रहे है २८ सितम्बर को.'

वरुण धवन, अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी सर्वांच्या अंगावर काटा आणणारा असा तिचा ‘परी’ चित्रपटातील भीतीदायक लूक प्रदर्शित केला. त्यानंतर दिवसाअखेर तिने वरुण धवनसोबतच्या आगामी ‘सुई धागा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले.

‘सुई धागा’च्या फर्स्ट लूकमध्ये अनुष्का ही ‘ममता’ या सामान्य स्त्रिच्या वेशात दिसते. साडी, हातात बांगड्या, भांगात कुंकू अशा या लूकमध्ये ही अभिनेत्री ८०-९०च्या दशकातील नुकतेच लग्न झालेल्या मुलीप्रमाणे दिसते. तर ‘मौजी’ ही व्यक्तिरेखा साकारणारा वरुण त्याच्या लूकने आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत वरुणने लिहिलं की, ‘EXCLUSIVE-मौजी और ममता से मिलिए २८ सितम्बर को.’ तर अनुष्काने आणखी एक फोटो शेअर करत लिहिलं की, ‘ममता और मौजी आ रहे है २८ सितम्बर को.’

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

‘परी’ आणि ‘सुई धागा’मध्ये अनुष्का परस्पर विरोधी भूमिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपण साकारत असलेल्या भूमिकांमध्ये विविध प्रयोग करण्याची ताकद आपल्यात असल्याचे अनुष्काने यातून दाखवून दिले आहे. ‘सुई धागा’मध्ये अनुष्का विणकराची ( एम्ब्रॉयडरी करणारी स्त्री ) तर वरुण शिंपीची ( टेलर ) भूमिका साकारत आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रचार चित्रपटातून करण्यात येणार आहे.

वाचा : डोळ्यातून प्रेम व्यक्त करणारा ‘तो’ आहे तरी कोण?

‘दम लगा के हायशा’ फेम शरत कटारिया ‘सुई धागा’चे दिग्दर्शन करणार असून मनिष शर्मा आणि यशराज फिल्म्स चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गांधी जयंतीच्या काही दिवस आधी २८ सप्टेंबरला ‘सुई धागा’ प्रदर्शित होईल. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

First Published on February 13, 2018 10:32 am

Web Title: sui dhaaga first look varun dhawan and anushka sharma are the perfect small town couple