मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला असून या चित्रपटामध्ये अनुष्काने ममता नावाच्या विणकाम करणाऱ्या स्त्रिची भूमिका वठविली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काने विणकाम करणाऱ्या स्त्रियांशी जोडली गेली असून तीने या महिलांकडून चक्क साड्या विकत घेतल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये चंदेरी हा जिल्हा असून हा जिल्हा खासकरुन साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘सुईधागा’मध्ये आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अनुष्काने चंदेरीमधील काही विणकरांकडून ही कला शिकण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने या विणकरांनी केलेल्या साड्यांच नीट निरीक्षण केलं. त्यातले बारकावे पाहिले. साडीवर करण्यात आलेल्या या सुंदर नक्षीकामामुळे अनुष्का या साड्यांच्या प्रेमात पडली आणि तीने एकाच वेळी चक्क ३५ चंदेरी साड्यांची खरेदी केली.

अनुष्काला या साड्या प्रचंड आवडल्या असून तिने ही खरेदी आपल्या घरातल्या स्त्रीयांसाठी केल्याचं सांगण्यात येत आहे. इतकचं नाही तर या साड्यांव्यतिरिक्त तीने स्वत:साठी देखील साड्यांची खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे.