17 February 2019

News Flash

#SuiDhaagaMadeInIndiaTrailer : मेक इन इंडियाची गोष्ट विणणारा ‘सुईधागा’

#SuiDhaagaMadeInIndiaTrailer : या संघर्षातूनच त्यांचा 'सुई धागा' हा नवा ब्रॅण्ड उदयाला येतो.

#SuiDhaagaMadeInIndiaTrailer : ‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या मौजी आणि ममताचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. यामध्ये वरुणने मौजीची तर अनुष्काने त्याच्या पत्नीची अर्थात ममताची भूमिका वठविली आहे.  सतत अपमानित झाल्यानंतर स्वत: चा व्यवसाय करण्याचा निर्णय मौजी आणि ममता घेतात. हा नवा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांच्या समोर येणारी आव्हानं, संघर्ष आणि त्यातून मिळालेलं यश यावर हा चित्रपट रेखाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संघर्षातूनच त्यांचा ‘सुई धागा’ हा नवा ब्रॅण्ड उदयाला येतो. हा नवा ब्रॅण्ड म्हणजे मेक इन इंडियाला चालना देणार असल्याचचं एकंदरीत दिसून येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अनुष्काने ट्विटवर शेअर केला असून त्याला समर्पक असं कॅप्शनही दिलं आहे.

शरत कटारिया दिग्दर्शित  ‘सुई धागा’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून  यानिमित्ताने वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. वरुण आणि अनुष्काने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा यातील भूमिका अत्यंत वेगळ्या असणार आहेत.

 

First Published on August 13, 2018 1:51 pm

Web Title: sui dhaga trailer out anushka sharma and varun dhawan shines in desi avtaar