सध्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. या चर्चा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने सुरु झाल्या आहेत. नवी दिल्लीत जॅकलिनची जवळपास पाच तास ईडीने चौकशी केली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर जॅकलिनला फोन करत असते. पण आपल्याला फोन करणारी व्यक्ती ही तुरुंगात आहे याबाबत जॅकलिनला माहिती नसल्याचे तिने सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर हा स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची कल्पना देखील नव्हती असे सांगितले आहे.

आणखी वाचा : नागार्जुनच्या बर्थडेला सून समांथा गैरहजर? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

या प्रकरणी सध्या तपास सुरु असून तापस यंत्रणेला सुकेशचे जवळपास २४ कॉल रेकॉर्ड सापडले आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जॅकलिनचे नाव समोर आले आणि तिची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सुकेशची सहकारी लीना पॉल यांचीही ईडीने चौकशी केली आहे.