News Flash

मालिकेतील या अभिनेत्रीवर आली कांदे-बटाटे विकण्याची वेळ, गिरीजाने शेअर केला व्हिडीओ

कांदे-बटाटे फुकटात द्यावे लागले.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीन चाहत्यांनी मनं जिकली आहेत. साधी, भोळी भाबडी गौरी अनेक प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहे.

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी सध्या रस्त्यावर कांदे-बटाटे विकत आहे. शूटिंगमधून वेळ काढून ते हे काम करत आहे. मिळेल त्या दराला तिच्यावर कांदे विकण्याची वेळ आली आहे. खरं तर गौरीनेच म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती कांदे-बटाटे विकताना दिसतेय.

गौरीने म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “आलू लेलो कांदे लेलो” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओत ती सुरुवातीला म्हणते, “सकाळ पासून बटाटा विकला नाही. ना अर्धा कांदा. झालाय माझा वादा” असं म्हणत ती रस्त्यातच खाली बसून “कांदे घ्या, बटाटे घ्या” ओरडत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. एवढ्यात तिथं जयदीप येऊन पोहचतो आणि तिला कांदा बटाट्यांचा भाव विचारतो. यावर गौरी तुम्ही म्हणाल तसे देते असं उत्तर देते. जयदीप कांदे फुकट देणार का? असा प्रश्न तिला विचारतो. यावर ती लगेचेच तयारही होते. आणि कांदे-बटाट्यांची पिशवी त्याच्या हातात देते.

गिरीजाने हा धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 2:24 pm

Web Title: sukh mhanje nakki kai asta actress girija prabhu share video selling potato and onion kpw 89
Next Stories
1 ‘थलायवी’च्या गाण्यावर करणचा डान्स? एडिटेड व्हिडीओ शेअर करत कंगना, म्हणाली….
2 फन अनलिमिटेड; देशमुख वहिनी जेनेलियाची कांचीसोबत धमाल
3 ‘मेजर’ सिनेमातील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक; क्यूट लूकवर चाहते फिदा
Just Now!
X