News Flash

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे १०० भाग पूर्ण

या निमित्ताने सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच निर्माते महेश कोठारे देखिल उपस्थित होते.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जयदीप-गौरीसोबतच मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून मालिकेने यशस्वीरित्या १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.

आणखी वाचा : कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात; प्राजक्ताने दिल्या शुभेच्छा

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जयदीप-गौरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा ज्योतिकाने प्रवेश केला आहे. गौरीला जयदीपपासून दूर करण्यासाठी तिचे प्लॅन्स सुरु आहेत. साधीभोळी गौरी ज्योतिकाला धडा शिकवणार का? हेदेखिल मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असे मालिकेचे पुढील भाग असतील. ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 5:00 pm

Web Title: sukh mhanje nakki kay asta 100 episodes completed ssv 92
Next Stories
1 मुंबईची श्वेता टूरकुल परिस्थितीवर मात करून करणार का स्वतःचं स्वप्न पूर्ण?
2 बॉलिवूड आर्टिस्ट सुरज गोदांबेला अटक; घरात सापडले कोट्यवधींचे ड्रग्स
3 डाएट विसरुन कियाराने केली समोसा पार्टी; पाहा व्हिडीओ
Just Now!
X