News Flash

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील मुख्य भूमिकेविषयी गिरीजा सांगतेय..

मुख्य भूमिका असलेली गिरीजाची ही पहिलीच मालिका आहे.

गिरीजा प्रभू

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर त्याची असंख्य उत्तरं आपल्याला मिळतील. प्रत्येकाची आपली अशी सुखाची व्याख्या असते. कुणासाठी पैसे म्हणजे सुख, कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख. सुखाची हीच परिभाषा स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्सची असून अभिनेत्री गिरीजी प्रभू या मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

या मालिकेतील भूमिकेविषयी गिरीजाने सांगितले, “मी गौरी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अत्यंत साधी आणि सर्वांवर प्रेम करणारी अशी ही मुलगी आहे. गौरी कधीच कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करत नाही. प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे त्याग असं तिला वाटतं. अश्या या भोळ्या गौरीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे या मालिकेच्या रुपात उलगडत जातील. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका एक कौटुंबिक मालिका आहे. कोल्हापूरात घडणारी ही गोष्ट आहे. सर्वसामान्य आयुष्यात आपलं सुख आपण कसं शोधत जातो तेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खूप सुंदररित्या मांडण्यात आलं आहे.”

मुख्य भूमिका असलेली गिरीजाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे करत आहेत. येत्या १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवीन मालिका सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 8:39 pm

Web Title: sukh mhanje nakki kay asta actress girija prabhu about her role in new serial ssv 92
Next Stories
1 ‘तारक मेहता..’मध्ये ‘या’ प्रसिद्ध कलाकाराची एण्ट्री; १२ वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर
2 असे तयार झाले ‘चक दे इंडिया’चे गाणे; सलीम-सुलेमान यांनी सांगितला किस्सा
3 नारायण राणे यांचा गौप्यस्फोट; “सुशांत सिंहची हत्याच, पण…”
Just Now!
X