सलमान खानच्या बहुप्रतिक्षित सुल्तान चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान हा हरियाणाचा कुस्तीपटू सुल्तान अली खान याची भूमिका साकारली आहे.
सुल्तानचा टीझर सलमानच्या दबंग स्टायलला साजेसा आहे. लंगोट परिधान केलेला सलमान त्याच्या दबंग अंदाजात कुस्तीच्या आखाड्यात येताना ‘खून में तेरी मिट्टी, मिट्टी में तेरा खून’ या ओळी ऐकू येतात. त्याने चित्रपटासाठी शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतल्याचेही यातून दिसून येते.
दरम्यान, सलमानने सोमवारीच ट्विटरवर सुलतानचं पोस्टर प्रसिद्ध करुन सुल्तान का पहला दांव, असं लिहिलं होतं. आदित्य चोप्राने सुल्तानची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यावर्षी ईदला ‘सुल्तान’ प्रदर्शित होईल.